लवकरच विजय मल्ल्या, नीरव मोदी भारताच्या स्वाधीन

लवकरच विजय मल्ल्या, नीरव मोदी भारताच्या स्वाधीन

यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवार, २२ एप्रिलला बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीत बोरिस यांनी पंतप्रधान मोदींना एक आश्वासन दिले आहे. बँकांची फसवणूक करून पळून गेलेले विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाईल, असे बोरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आश्वासन दिले आहे.

बोरिस जॉन्सन म्हणाले, ” प्रत्यार्पणाच्या प्रकरणांमध्ये काही कायदेशीर समस्या आहेत. यूके सरकारने विजय मल्ल्या, नीरव मोदींच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. भारतातून पळून जाण्यासाठी आमच्या कायदेशीर व्यवस्थेचा वापर करू इच्छिणाऱ्या लोकांचे आम्ही स्वागत करणार नाही. काही कायदेशीर अडचणी असल्याने या लोकांना भारतात प्रत्यार्पण करता आलेले नाही, मात्र लवकरच विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना भारताच्या स्वाधीन करू.” असे ते म्हणाले.

बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर युक्रेनच्या मुद्द्यावरही चर्चा केली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध ताबडतोब थांबले पाहिजे आणि हा प्रश्न चर्चेने सोडवला जावा, असे आमचे मत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यासोबतच जॉन्सन यांनीही पंतप्रधान मोदींच्या या मताला दुजोरा दिला आहे.

हे ही वाचा:

अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड

गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

‘हिंदुत्वावर मते मागणारे मुख्यमंत्री हनुमान चालिसाला विरोध करतात!’

ब्रिटीश पंतप्रधानांनी या काळात भारतासोबत आर्थिक संबंध मजबूत करण्याबाबतही चर्चा केली आहे. जॉन्सन म्हणाले की, यूके भारताला मुक्त सामान्य निर्यात परवाना दिला जाईल, ज्यामुळे संरक्षण खरेदीसाठी वितरण वेळेत पूर्ण होईल. तसेच ब्रिटन आणि भारत दरम्यान सॉफ्टवेअर अभियांत्रिकीपासून आरोग्यापर्यंतच्या क्षेत्रात १ अब्ज पाउंड पेक्षा जास्त नवीन गुंतवणूक आणि निर्यातीसाठी डील होणार आहेत.

Exit mobile version