विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी उडवली खिल्ली
आपल्या बेताल बडबडीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर विरोधी पक्षनेते (विधानपरिषद) प्रविण दरेकरांनी शालजोडीतील टीका केली आहे. दरेकरांनी सोमवारी (१० मे) पत्रकारांशी बोलताना सांगितले की संजय राऊतांना आता राष्ट्रीय नेता झाल्यासारखे वाटते आहे. त्यामुळे देशाचा पुढचा पंतप्रधान देखील तेच ठरवतील. दरेकर असे देखील म्हणाले की, राऊतांनी काँग्रेसची चिंता सोडून स्वत:ची चिंता करावी.
हे ही वाचा :
पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…
ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस
मुंबई – कानपूर दरम्यान सुपरफास्ट विशेष ट्रेन्स
यावेळी दरेंकरांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मागणीमुळे सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली आहे, पण राऊत मोदी द्वेषात एवढे आंधळे झाले आहेत, की त्यांनी कोर्टचा आदेश न वाचताच शिवसेनेच्या मुखपत्रातून यावर एक अग्रलेख लिहून टाकला. दरेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचून दाखवत सांगितले की, राऊतांनी अग्रलेख लिहीण्यापूर्वी कमीत कमी एकदा तरी आदेश वाचायला हवा होता. ते म्हणाले की कोरोनाबाबत मुंबई महानगरपालिकेने जे दावे केले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहीलं आहे, ज्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही. आज मुंबईच्या महापौरांनी सांगितले, की आम्हाला आकड्यांवर बोलण्याची इच्छा नाही. पण आमचे म्हणणे आहे की पालिकेने मृत्युचे आकडे लपवले आहेत.
केंद्रामुळे महाराष्ट्र लसीकरणात नंबर वन
लसीकरणावरून माहाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना दरेकर म्हणाले की, राज्यातील सरकार स्वतःच लसीकरणात महाराष्ट्र पुढे असल्याचा दावा करत आहेत. आत्तापर्यंत राज्यात १ कोटी ६६ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. जर केंद्राने पुरेशा प्रमाणात लस दिली नाही, तर इतक्या लोकांना लस दिली कशी. लसीकरण केंद्रांवरील अव्यवस्थेसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडण्यासाठी हे एक झाले आहेत.