महाबळेश्वर: अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी शिवसेना नेत्याची मुले आरोपी

महाबळेश्वर: अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी शिवसेना नेत्याची मुले आरोपी

महाबळेश्वर येथे एका अल्पवयीन मुलीवर घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणात स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांची दोन्ही मुले या बलात्कार प्रकरणात आरोपी आहेत. तर त्यांच्यासह इतर अकरा जणांना सहआरोपी करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाबळेश्वर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे गंभीर प्रकरण नुकतेच समोर आले होते. या बलात्कारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिने एका बाळाला जन्मदेखील दिला. त्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी या संपूर्ण प्रकरणाला आणखीन गंभीर वळण प्राप्त झाले असून शिवसेनेशी संबंधित असलेल्या स्थानिक पुढाऱ्याच्या मुलावर या प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर एकूण तेरा संशयितांमध्ये एका वकिलाचाही समावेश आहे.

आतापर्यंत पोलीस तपासातून सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड आणि आशुतोष मोहन बिरामणे या दोघांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित ऍडव्होकेट प्रभाकर हिरवे आणि संजय कुमार जंगम या दोघांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

आसाम सरकारने मुक्त केली मंदिरांची जमीन

जेंव्हा कमला हॅरिस पाकिस्तानी दहशतवादावर बोलतात…

काँग्रेसमध्ये रागाला जागा नाही, पण अपमानाला आहे?

संजय राऊतांना फुटल्या रावण प्रेमाच्या उकळ्या

दरम्यान या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष बावळेकर यांच्या मुलांनीही आरोपींना मदत केल्याचा संशय आहे. सनी उर्फ सात्विक दत्तात्रय बावळेकर याने बलात्कारातून जन्माला आलेल्या नवजात मुलीच्या जन्माची माहिती लपवण्याच्या हेतूने दत्तक पत्रासाठी स्वतःच्या नावाचा बॉण्ड विकत घेण्यास सहकार्य केले. तर त्याच्याच प्रयत्नांतून मुंबई येथील सुनील हिरालाल चौरसिया आणि पूनम सुनील चौरसिया यांना ही नवजात मुलगी दत्तक देण्यात आली.

तर त्याचा भाऊ योगश दत्तात्रय बावळेकर यांने इतर एकही साथीदारांच्या मदतीने नवजात मुलगी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या परिस्थितीत जन्माला आली याबाबतची माहिती लपवून दत्तक पत्रावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांची नावे देखील या प्रकरणात सहआरोपी म्हणून टाकण्यात आली आहेत.

Exit mobile version