कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. पण, या समारंभात काही महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेसने डावलले तर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी शपथविधी समारंभाला गैरहजर होते. त्यामुळे विरोधी ऐक्याला सुरूंग लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिले. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना वगळण्यात आले. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
हे ही वाचा:
बराक ओबामासह ५०० अमेरिकन नागरिकांना रशियात ‘नो एन्ट्री’
ऋषी सुनक यांचे एका वर्षात २००० कोटींहून अधिक नुकसान !
सिद्धरामय्या यांनी शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनीही घेतली ‘शपथ’
केरळ स्टोरीने ‘छत्रपती’ आणि ‘पीएस २’ अशा चित्रपटांना टाकले मागे !
”वाघशीर”; समुद्री चाचण्यांसाठी झाली सज्ज !
वास्तविक कर्नाटकातल्या शपथविधीचे निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः फोन करून ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि बाकीच्या महत्त्वाच्या विरोधी नेत्यांना दिले होते. पण ममता आणि उद्धव हे शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. या शपथविधी समारंभाला राहुल आणि प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला, अभिनेते कमल हसन, कम्युनिस्ट पार्टीचे नेते डी. राजा तसेच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहिले.
पण शपथविधी समारंभाच्या निमित्ताने काँग्रेसने विरोधी पक्षांच्या ऐक्याचे जे शक्तिप्रदर्शन करून घेतले, त्या शक्तिप्रदर्शनात सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.