सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल

रुग्णालयाने जारी केले आहे कि सध्या प्रकृती स्थिर

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘ब्रॉन्कायटिस’च्या आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने निवेदन जारी करून म्हंटले आहे कि, ७६ वर्षीय सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याआधी सोनिया गांधी यांना जानेवारी महिन्यांत विषाणूजन्य श्वसन संसर्गाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधी यांना काल रुग्णालयात दाखल केल्याचे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने यावेळेस स्पष्ट केले आहे.

सर गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डी.एस. राणा म्हणाले कि, सोनिया गांधी यांना तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेस्ट मेडिसिन विभागाचे मुख्य सल्लागार अरुप बसू आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या देखरेखीखाली  रुग्णालयातील डॉक्टर्स  सोनिया गांधी यांची तपासणी  करत असून त्या सर्व तज्ज्ञांच्या देखरेखीत आहेत. या वर्षात त्यांना आता दुसऱ्यांदा दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा:

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे सुश्मिता सेनने लिहिले आणि…

दोघे गुजरातवरून आले आणि शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची भिंत ओलांडली

ओदिशात सापडले १०० नंबरी सोने…

कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशन रायपुरमध्ये झाले त्या कार्यक्रमांत त्या सहभागी झाल्या होत्या तर, त्यावेळेस सोनिया गांधींकडून राजकारणातून निवृत्ती घेण्याचा त्यानी संकेतच दिला होता आणि त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या कि, “भारत जोडो यात्रेबरोबर माझीही राजकीय यात्रा संपत आहे याचा मला आनंद आहे”.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस पक्षाच्या सुकाणू समितीने सर्वोच्च परिषदेच्या आणि कार्यकारिणीच्या निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार दिले होते.

Exit mobile version