काँग्रेसचा आता आमच्या ‘राहुलला सांभाळा’चा प्रयोग, सोनियांनी पदर पसरला

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे सभेला संबोधित करताना केलं आवाहन

काँग्रेसचा आता आमच्या ‘राहुलला सांभाळा’चा प्रयोग, सोनियांनी पदर पसरला

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या भावूक झाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका सभेला त्या संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी जनतेला भावनिक आवाहनही केले. त्या म्हणाल्या की, “मी माझा मुलगा जनतेसाठी समर्पित करत आहे, त्याला सांभाळून घ्या.” यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही मंचावर उपस्थित होते. रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारसभेसाठी सोनिया गांधींची उपस्थिती होती.

“गांधी कुटुंबाकडून जी शिकवण मिळाली तीच राहुल आणि प्रियांका यांना दिली. सर्वांचा आदर करा, एखाद्या कमकुवत घटकासाठी लढायची वेळ आली तर लढा. संघर्षाची तुमची पाळेमुळे आणि परंपरा या मजबूत आहेत. मी तुम्हाला माझा मुलगा सोपवित आहे. जसे तुम्ही मला आपले मानले तसेच राहुलला देखील आपले माना. राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाही,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

पुढे सोनिया गांधी असेही म्हणाल्या की, “बऱ्याच दिवसांनंतर मला तुमच्यात येण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. खासदार या नात्याने मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. ते माझ्यासाठी खूप मोठे आहे. गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या घराण्याची पाळेमुळे ही या मातीशी जोडल्या गेली आहेत. इंदिरा गांधी यांच्या मनात रायबरेलीसाठी वेगळे स्थान होते. त्यांचे तुमच्यावर अतिव प्रेम होते,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

हे ही वाचा:

‘विदेश दौऱ्याचे तिकीटही बुक झाले, खटाखट-खटाखट’

“सपा, काँग्रेस सत्तेत आले तर, रामलल्ला पुन्हा तंबूत जाणार”

टी-२० वर्ल्डकप भारत-पाक सामन्यांचे तिकीट २ लाखात!

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे मागितले!

यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यात असेच आवाहन केलं होतं. “मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही. उद्धव आणि आदित्यला मी लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं होतं.

Exit mobile version