सोनिया गांधींनी दीड वर्ष घराचे भाडेच भरले नाही

सोनिया गांधींनी दीड वर्ष घराचे भाडेच भरले नाही

भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अमित मालवीय यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेली माहिती शेअर केली आहे. या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी गेल्या दीड वर्षापासून घराचे भाडे भरले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडून गुजरातमधील सुजित पटेल यांनी आरटीआय अतंर्गत माहिती मागवली होती. काँग्रेस नेत्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भाड्याची किती रक्कम थकीत आहे? असा प्रश्न विचारून त्यांनी माहिती मागवली होती. त्यांच्या या प्रश्नाला मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले आहे. यानुसार, २६ अकबर रोडचे १२ लाखांहून अधिक भाडे थकीत आहे. तर सोनिया गांधी यांचे सरकारी निवसस्थान असलेल्या १० जनपथचे चार हजार तर दिल्लीच्या चाणक्यपुरीतील अजय या निवसस्थानाचे पाच लाखांहून जास्त रुपये भाडे देणे बाकी आहे.

हे ही वाचा:

WWE सुपरस्टार ग्रेट खली भाजपामध्ये

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स

निवासस्थानाचे भाडे थकीत असल्यावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. तसेच वर्गणी काढून ती रक्कम सोनिया गांधींना पाठवणार असल्याचे ट्विट भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केले आहे. भाड्याचे पैसे देण्याइतकी वर्गणी जमली तर ती रक्कम त्यांना पाठवण्यात येणार असल्याचे भाजपने सांगितले आहे. SoniaGandhiReliefFund असा हॅशटॅगही सुरु करण्यात आला आहे.

Exit mobile version