काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना ईडीने समन्स पाठवले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने मायलेकांना समन्स पाठवले होते आणि ८ जूनला त्यांना ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सोनिया गांधींनी ईडीकडे वेळ मागितली आहे.
राहुल गांधी हे सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांना समन्स आल्यानंतर त्यांनी ईडीला पत्र लिहून पुढची वेळ मागितली होती. त्यांनतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठवून १३ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर उद्या, ८ जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी हजर राहायचे असताना त्यांनी ईडीकडे वेळ मागितली आहे. १ जून रोजी ईडीने राहुल आणि सोनिया गांधींना ईडीने समन्स पाठवले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांनी आता ईडीकडे वेळ मागितली आहे.
हे ही वाचा:
आत्मनिर्भर भारतासाठी ७६,३९० कोटींच्या संरक्षणविषयक सामग्रीच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता
ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन अविश्वास प्रस्तावा विरोधात विजयी
कुपवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
रायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह
दरम्यान, ‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र काढले होते. २००८ मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर आहेत.