काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.

३१ जानेवारीपासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. तर त्यासोबत देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार हे अधिवेशन उद्या म्हणजेच शुक्रवार, ८ एप्रिल पर्यंत अधिवेशन चालणार होते. पण आज म्हणजेच गुरुवार, ७ एप्रिल रोजी हे अधिवेशन अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’नंतर आता केबलमॅन, M-TAI

विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही

विकृतीने ओलांडल्या मर्यादा! घोरपडीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुण अटकेत

वसंत मोरेंची मनसे पुणे शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी! भोंग्यांबाबतची भूमिका भोवली?

यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीचं आमंत्रण दिले होते. सभागृहाची गरिमा वाढवण्यासाठी आणि चर्चा संवाद यांचा स्तर उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सर्व पक्षांनी सक्रिय सहकार्य देण्याची गरज असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलून दाखवल्या.

याच आमंत्रणानुसार काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी या पंतप्रधान मोदी यांना भेटल्या आहेत. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली किंवा ही भेट किती वेळ चालली याबाबत कोणताही अधिकचा तपशील समोर आला नाही. ओम बिर्ला यांनी या भेटीचे तसेच इतर पक्षाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.

Exit mobile version