लवकरच राज्यसभेची निवडणुक पार पडणार असून यासाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा सुरू आहे. अशातच कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांकडून महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून राज्यसभेच्या रिंगणात त्या उतरल्या आहेत.
काँग्रेसकडून राज्यसभेची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. याव्यतिरिक्त बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसची यादी
- माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी – राजस्थान
- अखिलेश सिंह – बिहार
- अभिषेक मनू सिंघवी – हिमाचल प्रदेश
- चंद्रकांत हांडोरे – महाराष्ट्र
हे ही वाचा:
सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी दिल्यास आर्थिक आपत्ती
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या निकटवर्तीयाच्या घरावर गोळीबार
‘चर्चेला तयार, परंतु नवीन मुद्दे आणणे थांबवा’
दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवर ‘आप’चे पक्ष कार्यालय!
दरम्यान, २०२२ मध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या होत्या. त्यावेळी चंद्रकांत हांडोरे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाने प्रसाद लाड या पाचव्या उमेदवार निवडून आणले होते. त्याचवेळी काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतु, चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले होते.