ईडीच्या चौकशीआधी सोनिया गांधी यांना कोरोना

ईडीच्या चौकशीआधी सोनिया गांधी यांना कोरोना

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू असल्यामुळे काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नुकतीच सोनिया यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली आहे. ८ जून रोजी सोनिया यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना संध्याकाळी थोडा ताप होता, त्याची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

लागण झाल्याचे कळल्यानंतर सोनिया यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. शिवाय, त्यांच्यासह बैठकांमध्ये असलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा सूरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना ईडीने समन्स पाठवले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया आणि राहुल गांधींना समन्स पाठवले असून, ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी

गोव्यात तरुण पर्यटकांना घरात कोंबून मारहाण

KK चा अलविदा; एक धक्का!

शरद पवार अहिल्यादेवींना खरोखरच मानतात का?

 

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या समन्समुळे पुन्हा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१५ मध्ये तपास यंत्रणेने हे प्रकरण बंद केले होते. मात्र आता ईडीनं गांधी मायलेकांना समन्स पाठवलं आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना ईडीने ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या राहुल गांधी परदेशात आहेत.

 

Exit mobile version