अल्पसंख्याक मंत्री मलिक म्हणतात की माझ्यावर पाळत

अल्पसंख्याक मंत्री मलिक म्हणतात की माझ्यावर पाळत

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी काल ट्विट करत दोन व्यक्तींचा फोटो पोस्ट केला होता. या व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून शाळेची आणि घराची रेकी करत असल्याचा आरोप केला त्यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रकरणे उघड केली आहेत. तेव्हापासून माझ्यावर काही लोक पाळत ठेवत असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे पोहचल्याचे त्यांनी म्हटले आहे. यांची माहिती मिळाली असून लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

खोट्या तक्रारी करून कट कारस्थान रचल जात असल्याचे नवाब मालिकांनी म्हटले आहे. राज्यात एक अनिल देशमुख झाले आणि बाकीच्यांनाही तुम्ही तेच करणार असाल तर, आम्ही ते सहन करणार नाही. माझ्या विरोधात खोट्या घटनांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्र्यांना खोट्या आणि फर्जी प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. आणि मी ते कोर्टात सादर करणार आहे.

हे ही वाचा:

वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसला; ६ ठार

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

माझ्या विरोधात केंद्रीय यंत्रेणेचे अधिकारी माझ्या विरोधात मेसेजेच पसरवत आहेत. माझ्या विरोधात लोकांना मेल पाठवून केंद्रीय यंत्रणा मंत्र्याला पाडण्याचा डाव रचत आहे. मी अमित शाहांना यासंबंधी तक्रार करणार आहे. तुमच्या हाताखालचे अधिकारी असे काम करत असतील तर त्याचे उत्तर मिळायला हवे, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे.

Exit mobile version