संसद भवनविरोधींची कृती बालिशपणाची!

काही भाजपविरोधी पक्ष आणि नेत्यांचा उद्घाटनाला पाठिंबा

संसद भवनविरोधींची कृती बालिशपणाची!

एकीकडे १९ पक्ष हे २८ मे रोजी होत असलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालत असताना विरोधकांमधीलच काहींना मात्र विरोधकांची ही कृती बालिशपणाची वाटते.  

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी म्हटले आहे की, भारताची संसद ही भारताची ठेव आहे. देशाच्या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान करणार नाहीत तर कोण करणार? संसदेचे उद्घाटन काय पाकिस्तानचा पंतप्रधान करणार काय? विरोधकांनी मोदींचा विरोध जरूर करावा पण देशाचा विरोध कशासाठी? आपल्या विधानांचा विचार विरोधकांनी जरूर करावा. संसद एखाद्या पक्षाची नाही. संसद भाजपाची आहे हे म्हणणे योग्य नाही. त्यामुळे विरोधकांनी ओवैसीच्या म्हणण्याप्रमाणे चालू नये.  

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांच्याकडूनही विरोधकांच्या भूमिकेच्या समर्थनाची अपेक्षा असताना त्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळलेला नाही. ते म्हणतात की, उद्घाटनासंदर्भात चाललेला गोंधळ बाजुला ठेवूया. उलट या इमारतीचे स्वागतच करायला हवे. खरे तर ही इमारत प्रभावी वाटते आहे. आमच्यापैकी अनेकांचे म्हणणे होते की, आपल्याला नव्या इमारतीची गरज आहे. मग आता या इमारतीला विरोध कशासाठी?  

सामाजिक कार्यकर्ते आदिल हुसेन यांनीही उद्घाटनाला पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, ही नवी इमारत लोकशाहीचे मंदिर आहे. त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमानच वाटला पाहिजे. गेल्या ७० वर्षात असे नेतृत्व आपल्याला लाभले नाही. जागतिक स्तरावर जर नरेंद्र मोदी यांचे मानांकन पाहिले तर ते ७८ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मानांकन ४३ आहे. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे पण त्याला फारसे महत्त्व नाही. या मुद्द्यावर खरे तर राजकारण होता कामा नये.

हे ही वाचा:

पावसाची स्थिती यंदा सामान्य, ९६ टक्केचा अंदाज !

संजय राऊत यांनी कबूल केले आम्ही थकलो!

कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या चित्त्याच्या चार बछड्यांपैकी आता एक जिवंत

शास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांनी सर्वप्रथम पंतप्रधानांना दिली ‘सेंगोल’ची कल्पना

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी यांचे प्रवक्ते फिरदौस यांनी म्हटले आहे की, विरोधकांचे हे वर्तन बालिश प्रकारात मोडणारे आहे. विरोधक ज्या पद्धतीने या मुद्द्याला हवा देत आहेत तेवढा तो मोठा अजिबात नाही. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे, हे योग्यच आहे. त्याचा अजेंडा तयार करण्याची गरज नाही. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यापेक्षा या कार्यक्रमाचे दोन्ही हात पसरून स्वागत करायला हवे. ते आपले पंतप्रधान आहेत. त्यांचा अपमान योग्य नाही. दरम्यान, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही या उद्घाटनाला पाठिंबा दिलेला आहे. तर बिजू जनता दलाचे नेते व ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही उद्घाटन कार्यक्रमाला जाणार असल्याचे म्हटले होते. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीही आपण या कार्यक्रमाला जाणार आहोत, ही ठाम भूमिका घेतली आहे.

Exit mobile version