किरीट सोमैय्या यांची टीका
सध्या समीर वानखेडे यांच्या जातधर्मावरून जे काही चालले आहे त्याची मला कीव येते. मीडियात काय चालले आहे? ही महाराष्ट्रातील घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ‘ट्रिक’ आहे, अशा शब्दांत माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. समीर वानखेडे तू मुस्लिम आहेस, तू दलित नाहीस, तू मुस्लिम आहेस असे आरोप सुरू आहेत. सगळी थट्टाच चालली आहे.
मूळ प्रकरण हे आर्यन खानच्या मागे कोण ड्रग माफिया आहेत हे आहे. समीर वानखेडे जन्मतारखेचा दाखला शोधा, बायकोच्या इज्जतीचा पंचनामा करा, बहीण वडिलांची प्रतिष्ठा धुळीला मिळवा, असे सगळे चालू आहे.
हे ही वाचा:
‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी
“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र
नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधीचा प्रवाह
नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी
सोमैय्या म्हणाले की, मुळात हा कुटुंबाचा विषयच कुठे आला? ड्रग माफियांकडून वसुली कमी झाली का सरकारची? सरकारमधील घोटाळ्यांच्या चौकशीला वेगळे वळण देण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जात आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुखांवर कारवाई करण्यास उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. अडसूळ यांचा घोटाळा समोर आला आहे. हसन मुश्रीफ यांनी १५ हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे. ते मंत्रिमंडळात राहूच कसे राहतात. परमबीर फरार आहेत. खासदार भावना गवळींनी घोटाळा केला आहे. महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंची संख्या सर्वाधिक होती, अनिल परब यांचा बंगला अनधिकृत आहे, हे उघड झाले आता अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकर खात्याच्या धाडी सुरू आहेत. या सगळ्या प्रकरणांपासून लक्ष वळवण्यासाठी हे समीर वानखेडे प्रकरण उकरून काढले आहे. ही सगळी बदमाशी आहे घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी.