पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान बेनेट हे पंतप्रधान मोदी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि देशातील ज्यू समुदायालाही भेट देणार आहेत.
२ एप्रिल रोजी बेनेट हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. २ एप्रिल या तारखेचे महत्व म्हणजे इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधांच्या स्थापनेला या दिवशी तीस वर्ष पूर्ण होणार आहेत. या वर्धापन दिनानिमित्त ही खास भेट होणार आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ग्लासगो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत बेनेट आणि पीएम मोदींची पहिली भेट झाली होती. तिथे पंतप्रधान मोदींनी बेनेट यांना भारताच्या अधिकृत भेटीसाठी आमंत्रित केले होते.
इस्रायलच्या पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ” पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताला पहिली अधिकृत भेट देताना बेनेट यांना आनंद झाला आहे. या भेटीचा उद्देश म्हणजे दोन्ही देशांमधील युती वाढवून युती मजबूत करणे आणि द्विपक्षीय संबंधांचा विस्तार करणे हा आहे. याव्यतिरिक्त, अर्थव्यवस्था, संशोधन व विकास, कृषी आणि बरेच काही अश्या विविध क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर पीएम मोदी आणि पीएम बेनेट यांच्यात चर्चा होणार आहे.
भारत आणि इस्रायलमधील संबंध पुन्हा सुरू करण्याचे श्रेय बेनेट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. “आम्ही भारतीयांकडून अनेक गोष्टी शिकू शकतो आणि नेहमी शिकत राहण्याचा आमचा कायम प्रयत्न असेल, असे बेनेट म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं
अमित शाहांनी घेतला जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा
टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप
चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया
भारताने १९९२ मध्ये इस्रायलच्या तेल अवीव या शहरात २ एप्रिलला भारताचे दूतावास उघडले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील पूर्ण राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट होणार आहे.