….म्हणून भाजपाच्या खासदारांच्या मुलांना तिकीट नाही!

….म्हणून भाजपाच्या खासदारांच्या मुलांना तिकीट नाही!

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या मुलांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला होता. कारण घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि भाजपा पक्षाच्या विरोधात असल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने शानदार विजय मिळवला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधताना पंतप्रधान मोदी हे म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे सभेत आगमन होताच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील खासदारांनी चार राज्यांतील विजयाबद्दल टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर संसदीय पक्षाच्या बैठकीत भारतरत्न लता मंगेशकर, कर्नाटकातील बजरंग दल कार्यकर्ता हर्षा, युक्रेनमध्ये मृत्युमुखी पडलेले भारतीय विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी आणि नड्डा यांनी बैठकीला संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले, “देशात घराणेशाहीच्या विरोधात वातावरण आहे. आणि भाजपाने लोकांच्या या भावनेचा आदर करत भाजपच्या नेत्यांच्या मुलांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला.” हा निर्णय खुद्द पंतप्रधान मोदींनी स्वतः घेतला आणि भाजपा पक्षाने या निर्णयाचा आदर केल्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

हे ही वाचा:

काँग्रेसला धक्का देत शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल

गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!

आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

ऑपरेशन गंगामुळे २२ हजाराहून अधिक नागरिक परतले भारतात

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना सल्ला देताना सांगितले की, खासदारांनी त्यांच्या भागातील १०० बूथ ओळखावेत जिथे भाजपला कमीत कमी मते मिळाली आहेत. आणि बुथवरील हरवलेले पक्षाच्या पराभवामागील कारणे शोधण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर तिथल्या लोकांना केंद्रीय योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे तपासून पाहावे. याशिवाय खासदारांना अधिकाधिक सर्वसामान्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले.

Exit mobile version