युक्रेन आणि रशियामधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. या युद्धात अमेरिकेलाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. भारताने रशियासोबतचा व्यापार थांबवावा अशी अमेरिकेची इच्छा आहे, मात्र मोदी सरकारने असे कोणतेही पाऊल उचलले नाही. म्हणूनच, दिल्लीतील अमेरिकन दूतावासासमोर अज्ञात लोकांनी एक पोस्टर चिकटवले असून, त्यामध्ये अमेरिकन सरकारने भारताला धमकावणे बंद करावे, असे लिहिले आहे.
यूएस दूतावासाच्या बाहेर एक निळा बोर्ड आहे, ज्यावर शुक्रवारी, १ एप्रिलच्या रात्री कोणीतरी पोस्टर चिकटवले होते. त्यावर ‘भारताला घाबरवणे बंद करा’ असे लिहिले आहे. रात्री १०.१५ च्या सुमारास दिल्ली पोलिसांना ही माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
पोस्टरमध्ये लिहिले होते की,’ बायडेन प्रशासन, भारताला धमकावणे बंद करा. आम्हाला तुमची गरज नाही. चीनविरुद्ध अमेरिकेला भारताची गरज आहे. आम्हाला आमच्या सर्व शिस्तबद्ध आणि शूर भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय जवान, जय भारत. ‘ आता हे पोस्टर हटवण्यात आले असले तरी त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा:
वसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचे लोकार्पण
नवाब मलिकांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा
दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव्ह भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, रशिया आणि भारताचे संबंध अतिशय मजबूत आहेत. रशियन सरकार भारताला जे काही मागेल ते पुरवायला तयार आहे.