अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पार्टी त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
एवढ्या दिवस तुरुंगात असूनही मलिकांचा राजीनामा ठाकरे सरकारने घेतलेला नाही. यासंदर्भातच चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘राज्यातील एक मंत्री इतके दिवस तुरुंगात राहूनसुद्धा त्याचा राजीनामा न घेणं ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. आमच्या पक्षावर जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करणारे आज एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा घेत नाहीत.’
नवाब मलिकांना जेव्हा ईडीने मनीलाँड्रिंग प्रकरणी अटक केली. तेव्हापासून भाजपा मलिकांच्या राजीनाम्याबद्दल आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी याबाबत भाजपाने आंदोलने केली. ठाकरे सरकारने काल मालिकांचा मंत्रिपदाचा कारभार काढून घेतला. मात्र तरीही अजून त्यांचा राजीनामा घेतलेला नाही, आता ते बिनखात्याचे मंत्री आहेत.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात दहा मंत्र्यांनी घेतली शपथ
एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!
“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”
चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया
मलिकांचे मंत्रिपद काढून न घेतल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. ईडीने अटक केल्यानांतर मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानेही मलिकांची याचिका फेटाळून लावली. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.