….म्हणून काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांचे नातू विक्रमादित्य यांनी सोडली काँग्रेस

….म्हणून काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांचे नातू विक्रमादित्य यांनी सोडली काँग्रेस

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना पुन्हा एकदा लोकांसमोर आल्या आहेत. मात्र, देशातील विरोधी पक्षनेते याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या राजकारणावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिसून येत आहे. या चित्रपटामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. कारण दिवंगत महाराजा हरि सिंह यांचे नातू आणि करण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी पक्ष सोडला आहे.

सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस सत्यापासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विक्रमादित्य सिंह जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावरील त्यांचे विचार राष्ट्रीय हित प्रतिबिंबित करतात. मात्र, काँग्रेसच्या भूमिकेशी ते जुळत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र सार्वजनिक केले असून त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिंह २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांनतर २०१९ मध्ये उधमपूर पूर्वमधून निवडणूक हरले होते. त्यांचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पराभव केला. विक्रमादित्य सिंह म्हणाले, “माझा विश्वास आहे की काँग्रेस राज्याच्या जनभावना समजून घेण्यात अपयशी ठरली आहे.” जम्मू-काश्मीरच्या अनेक मुद्द्यांवर मी राष्ट्रहिताला पाठिंबा दिला आहे, माझी भूमिका काँग्रेसपेक्षा पूर्णपणे वेगळी होती, म्हणून मी राजीनामा दिला आहे.”

हे ही वाचा:

हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

केंद्रीय यंत्रणेच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेकडून वसुली?

…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य

पाकिस्तानातील बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधील ग्राम संरक्षण समित्यांचा पुनर्विकास तसेच कलम ३७० रद्द करणे आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवणे या मुद्द्यांवर सिंह यांची भूमिका काँग्रेसपेक्षा वेगळी होती.

Exit mobile version