काही दिवसांपूर्वी झोमॅटो कंपनीने ग्राहकांना दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी झोमॅटोच्या या निर्णयावर खूप चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या. असेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी झोमॅटो कंपनीला या निर्णयावर फटकारले आहे. दहा मिनिटांची डिलिव्हरी ही तत्काळ सेवा कंपनीने बंद करावी, असे ते म्हणाले आहेत.
तात्काळ डिलिव्हरीच्या नादात राज्यात वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा इशारा मिश्रांनी झोमॅटो कंपनीला दिला. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला कंपनी जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मिश्रांनी झोमॅटो कंपनीला सांगितले की, लवकरात लवकर तुम्ही दहा मिनिटांत खाद्यपदार्थ पोहोचवण्याचा नियम बदला, हे धोकादायक आहे, असा इशारा त्यांनी कंपनीला दिला आहे.
मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अवघ्या दहा मिनिटात डिलिव्हरी करण्याच्या नादात डिलिव्हरी बॉईज धोकादायक पद्धतीने गाडी चालवणार. त्या धोक्याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच न होता त्याच्या इतरांनाही धोका असणार आहे. दहा मिनिटांत अन्न पोहोचवण्याचे आश्वासन देऊन झोमॅटो आपल्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. झोमॅटो किंवा कोणत्याही कंपनीला वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हे ही वाचा:
‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’
ताफा अडवून किरीट सोमय्यांना खेड पोलिसांची नोटीस
मुख्यमंत्री गुड गोइंग ते बॅड गोइंग
झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल यांनी सोमवारी ट्विट करून झोमॅटो तात्काळ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. निवडक ठिकाण आणि काही खाद्यपदार्थांसाठी दहा मिनिटांत झोमॅटो ग्राहकांना सेवा देणार आहे. तसेच उशीरा डिलिव्हरीसाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी घोषणा गोयल यांनी केली होती.