‘भारतमातेची हत्या झाल्याच्या राहुल गांधी यांच्या उल्लेखावर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या!’

स्मृती इराणी यांनी केला घणाघात

‘भारतमातेची हत्या झाल्याच्या राहुल गांधी यांच्या उल्लेखावर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या!’

भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी लोकसभेत राहुल गांधी यांच्या भाषणावर घणाघात केला. राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये जे झाले त्यामुळे भारतमातेची हत्या झाली असे उद्गार काढले होते. त्यावर बोलताना स्मृती इराणी यांनी म्हटले की, भारतमातेची हत्या झाली हे राहुल गांधी बोलले त्यावर टाळ्या वाजविण्यात आल्या. यावरून कुणाच्या मनात गद्दारीची भावना आहे हे स्पष्ट झाले.

 

 

इराणी यांनी राहुल गांधींच्या या भाषणाचा समाचार घेतला. देशाच्या इतिहासात प्रथमच भारतमातेची हत्या झाली असा वाक्प्रचार संसदेत ऐकायला मिळाला. त्यावेळी काँग्रेस पक्ष टाळ्या वाजवत होता. मणिपूर हा विभागलेला नाही उलट तो देशाचा अविभाज्य भाग आहे. काश्मिरी पंडितांवर तुम्हा का बोलला नाहीत, असा सवाल विचारत इराणी म्हणाल्या की, तामिळनाडूमधील डीएमके पक्षाचा एक नेता भारत म्हणजे उत्तर भारत असे म्हणाला होता. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी डीएमकेला जाब विचारावा. काश्मीरला भारतापासून वेगळे करा असे काँग्रेस नेता म्हणतो तेव्हा तुम्ही का बोलत नाही?

 

 

काश्मीरमध्ये गिरिजा टिक्कू, शीला भट्ट यांच्यावर बलात्कार आणि हत्या झाली  आणि त्याचा उल्लेख चित्रपटात आला तेव्हा तो प्रपोगंडा म्हणून सांगितले गेले. काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांबाबत बोलण्याची त्यांची इच्छा नाही. इराणी यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये एकेकाळी रक्तपात होत होता. ३७० कलम रद्द केल्यानंतर मात्र राहुल गांधी याच काश्मीरमध्ये फिरत होते. हे कलम हटविल्यामुळेच त्यांना ते शक्य झाले. पण हेच काँग्रेस नेते तिथे गेल्यावर पुन्हा ३७० कलम लागू करण्याबद्दल बोलू लागले.

हे ही वाचा:

युती ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

 

 

मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या

 

राहुल गांधी यांनी अखेर केले भाषण

 

लोकसभेत बुधवारी राहुल गांधी यांचे भाषण अखेर झाले. मंगळवारी त्यांचे भाषण होणार होते पण ते लोकसभेत आले नाहीत. बुधवारी मात्र त्यांनी भाषण केले. त्यात त्यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारासंदर्भात बोलताना मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचा उल्लेख केला. तुम्ही मणिपूरमधील लोकांना मारून भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात.

 

Exit mobile version