संसदेत माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर राहतात!

भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केले राहुल गांधींवर घणाघाती आरोप

संसदेत माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर राहतात!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या भाषणानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. संसदेत राहुल गांधी यांनी या भाषणातून जी देशाची बदनामी केली आहे, त्यासंदर्भात त्यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही यानिमित्ताने राहुल गांधी यांच्यावर शरसंधान केले आहे.

स्मृती इराणी म्हणतात की, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली आहे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या संस्थांचा त्यांनी अनादर केला आहे. त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांचाही अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी यासंदर्भात देशाची माफी मागावी.

स्मृती इराणी म्हणाल्या की, जेव्हा राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काँग्रेस नेत्यांना कागद फाडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांसमोर प्रवृत्त केले तेव्हा लोकशाही नव्हती का? सभापतींच्या दिशेने कागद फाडून फेकण्याचे आदेश गांधी कुटुंबियांनी आपल्या नेत्यांना दिले तेव्हा लोकशाही कुठे होती? आज प्रत्येक भारतीय नागरीक राहुल गांधींकडे माफीची मागणी करत आहे. पण संसदेत उपस्थित राहण्याऐवजी आणि माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर आहेत.

हे ही वाचा:

ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?

सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय

अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या

‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन

इराणी यांनी प्रश्न उपस्थित केला की, राहुल गांधी दावा करतात की, भारतीय विद्यापीठांमध्ये संवाद साधण्यासाठी आपल्याला परवानगी मिळत नाही, म्हणजेच लोकशाहीचा अंत झाला आहे. मग २०१६मध्ये एका विद्यापीठात भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा देण्यात आल्या तेव्हा मात्र राहुल गांधी यांनी त्याचे समर्थन केले होते. इराणी यांनी राहुल गांधींवर आक्रमण करताना म्हटले की, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करतात आणि आता देशाचाही द्वेष करतात. भारतीय कारभारात लक्ष घालण्यासाठी त्या परकीय शक्तींना आवाहन करतात.

Exit mobile version