राहुल गांधी म्हणजे निराश ‘राजपुत्र’

स्मृती इराणी यांनी केला हल्लाबोल

राहुल गांधी म्हणजे निराश ‘राजपुत्र’

मणिपूरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत, अशी टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी सकाळी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौऱ्याच्या निमित्ताने आणि राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निमित्ताने टीका केली आहे. त्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

इराणी यांनी गांधी कुटुंबियांच्या घराणेशाहीवर टीका करताना म्हटले आहे की, राहुल गांधी हे निराश झालेले ‘राजपुत्र’ आहेत. नियमितपणे परदेशात जाऊन भारतातील घडामोडीत हस्तक्षेप करण्याची मागणी राहुल गांधी करतात. भारताच्या पंतप्रधानांना एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा ते त्याची थट्टा करतात. पण त्यांना लोकांनी नाकारले आहे. आपल्या घराण्याच्या पायथ्याशी संरक्षण करार येत नाहीत, यासाठी राहुल गांधी ही खळखळ करत आहेत.

 

राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की, मणिपूरच्या विषयावर पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. युरोपियन संसदेने मणिपूरच्या विषयावर चर्चा केली होती. राफेलचा व्यवहार केल्यामुळे मोदींना बॅस्टिल डे परेडसाठी आमंत्रण मिळाले होते.
राहुल गांधी यांनी युरोपियन संसदेचा उल्लेख केलेला असला तरी त्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले होते. १२ जुलैला युरोपियन संसदेने मणिपूरचा विषय चर्चेला घेतला होता. तिथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे या संसदेत मत व्यक्त करण्यात आले.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व लाभलं

मोट बांधणाऱ्यांची बोटच फुटली

पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंग्याने उजळला

जमीन-अवकाशात जयहिंदचा नारा

भारत सरकारने युरोपियन संसदेच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली. परराष्ट्र मंत्रालयाने मणिपूर हा भारताचा अंतर्गत विषय असून त्यात नाक खुपसण्याची युरोपियन संसदेला गरज नाही, असे स्पष्ट शब्दात सुनावले. त्यापेक्षा आपला हा बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्या अंतर्गत विषयात लक्ष घालण्यात घालवावा, असेही परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना सांगितले.
राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात भारताच्या धोरणांवर, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. परदेशात जाऊन भारतावर टीका करण्याची त्यांची सवय सातत्याने टीकेचे लक्ष्य बनत आलेली आहे. इतर देशांनी भारताच्या घडामोडींमध्ये लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी अनेकवेळा आपल्या परदेश दौऱ्यात केली आहे.

Exit mobile version