प्रियांका वड्रा यांनी नमाज अदा केला होता… स्मृती इराणींचा नवा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा प्रियांका गांधींवर निशाणा

प्रियांका वड्रा यांनी नमाज अदा केला होता… स्मृती इराणींचा नवा गौप्यस्फोट

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली जोरदार असून आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यातील जनतेला भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी मंदिर बांधण्याचे वचन जनतेला दिले आहे. यावरून स्मृती इराणी म्हणाल्या की, शिवकुमार यांनी राज्यात मंदिरे बांधण्याचे आश्वासन दिले असताना, त्यांच्या सहकारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची निष्ठा इस्लामशी आहे, जी मूर्तीपूजा किंवा मंदिरे बांधण्याच्या विरोधात आहे.

स्मृती इराणी यांनी ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांना २०१९ मध्ये अमेठी येथे नमाज अदा करताना पाहिल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. इस्लामला मानणारे आणि नमाज अदा करणारे लोक मूर्तीची पूजा करत नाहीत आणि कदाचित याच कारणामुळे काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने राम मंदिराच्या बांधकामाला विरोध केला.

“काँग्रेसला भगवान श्रीरामांबाबत अडचण होती आणि आता त्यांना बजरंगबलीचीही अडचण आहे. रामभक्त आणि बजरंगबलीच्या भक्तांबद्दल असा राग आणि द्वेष काँग्रेस पक्षाला शोभत नाही!” अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, पीएफआयसारख्या संघटना दहशतवादी कटात सामील होत्या, त्यांची बजरंग दलाशी तुलना करणे चुकीचे आहे. काँग्रेस हिंदुविरोधी आहे. तर काही दिवसांपूर्वीच एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बजरंग बली’चा नारा दिला होता. याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

हे ही वाचा:

पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले 

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत

“ज्यांना बजरंगबलीचे नाव घेतल्यावर राग येतो, त्यांना हिंदूंवर किती चीड येत असेल? रामभक्तांच्या विरोधात फक्त काँग्रेस पक्षच बोलू शकतो.” अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली आहे.

Exit mobile version