केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राहुल गांधी आले आमनेसामने आणि…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राहुल गांधी आले आमनेसामने आणि…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी चर्चेत आल्या. दोन घटनांमुळे स्मृती इराणीबाबत ही चर्चा रंगली. बजेट सादर करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी संसद सदस्य संसदेत उपस्थित राहिले. त्यावेळी स्मृती इराणी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आमनेसामने आले. दोघांची नजरानजर झाली पण कोणताही संवाद झाला नाही. त्यांचे ते छायाचित्र व्हायरल झाले असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

खरे तर, स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधींना पराभूत केल्यापासून हे दोघेही एकमेकांवर विविध प्रश्नांच्या निमित्ताने आरोप करत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील द्वंद्व लक्षात घेता ही नजरानजर वेगळ्या अर्थाने पाहिली गेली.

हे दोघेही पायऱ्यांच्या जवळ उभे होते. स्मृती इराणी यांच्यासोबत मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपा नेते तर राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल उभे होते. त्याचवेळी स्मृती आणि राहुल यांनी एकमेकांकडे पाहिले आणि छायाचित्रकाराने नेमका क्षण पकडला.

हे ही वाचा:

मुंबईमध्ये फक्त भाजपच बदल घडवून आणेल

‘आगामी आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ८ ते ८.५० टक्के राहील’

उद्धवजी, राऊत यांच्या वक्तव्यांना आपली संमती आहे काय?

‘पुढील २५ वर्षात सर्वसमावेशक, सर्वहितकारक, आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नशील’

 

दुसरी घटना स्मृती इराणी यांच्याबाबत घडली ती मुलायम सिंह यादव यांच्यासंदर्भातील. वृद्ध आणि अनुभवी समाजवादी पक्षप्रमुख मुलायमसिंह संसदेतून बाहेर येत असताना स्मृती इराणी त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांच्या पाया पडल्या. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याचा व्हीडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला. सध्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकांत समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्यात मुख्य संघर्ष आहे. या राज्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होणार की अखिलेश याची चर्चा सध्या सुरू आहे. ही निवडणूक देशाचे राजकारण बदलू शकते असे नेहमीच म्हटले जाते. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाच्या नेत्याचे आशीर्वाद घेण्यासाठी स्मृती पुढे सरसावल्यामुळे त्याची चर्चा होणे स्वाभाविकच होते.

Exit mobile version