छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे हवाला ऑपरेटर्सच्या मदतीने त्या राज्यातील निवडणूक लढवत आहेत, असा घणाघाती आरोप भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा पैसा वापरला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयातील कार्यक्रमात इराणी यांनी हा आरोप केला. शिवाय, बघेल सरकारवर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
त्या म्हणाल्या की, सत्तेत असताना सट्टेबाजीचा खेळ हाच भूपेश बघेल सरकारचा खरा चेहरा आहे. भूपेश बघेल यांच्याविरोधात काही आश्चर्यजनक अशी तथ्ये समोर आली आहेत. असीम दास यांच्याकडून ५.३० कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यावर इराणी म्हणाल्या की, २ नोव्हेंबरला हॉटेल ट्रायडंटमध्ये असीम दास यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे का? हे खरे आहे का की, शुभम सोनी यांना असा आदेश एका व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून देण्यात आला ज्यातून त्यांना रायपूरला जाऊन बघेल यांना निवडणुकीसाठी पैसे देण्यास सांगण्यात आले? हे खरे आहे का की, विविध बँक खात्यातून १५.५० कोटी इतकी रक्कम फ्रीज करण्यात आली.
हे ही वाचा:
इस्रायलचा गाझामधील शाळेवर एअर स्ट्राईक; २० जण ठार
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर; संघात प्रसिद्ध कृष्णाची लागली वर्णी
एल्विश यादव म्हणतो, रेव्ह पार्टी, ड्रग्ज संबंधीतील आरोप खोटे
आपचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी!
केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या की, शुभमने लिखित स्वरूपात आपले म्हणणे मांडले आहे. त्यात महादेव ऍपच्या प्रमोटर्सनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५३८ कोटी रुपयांची लाच दिल्याचे म्हटले आहे. केवळ हीच माहिती नाही तर आणखी एक आश्चर्यकारक अशी माहिती समोर आली आहे ती म्हणजे महादेव ऍपचे प्रमोटर्स काँग्रेस नेता तसेच प्रशासनाकडून जे संरक्षण अपेक्षित करत होते त्यासाठी चंद्रभूषण वर्मा नावाच्या अधिकाऱ्याच्या मार्फत सुरक्षेसाठी पैसे पाठवत होते. चंद्रभूषण वर्माने आतापर्यंत लाचेच्या स्वरूपात ६५ कोटी इतकी रक्कम हाताळली आहे.
इराणी म्हणाल्या की, शुभम सोनी याच्याबद्दल असीम दासने माहिती दिली आहे. शुभम सोनीची ऑडिओ क्लिपही उपलब्ध आहे. असीम दासने हे कबूल केले आहे की, आदेश मिळाल्यानंतर ते दुबईला रवाना झाले होते. काँग्रेसला निवडणुकीसाठी पैसे दिले जावे असे ते आदेश होते.