राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!

भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला घणाघात

राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!

भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला घणाघातमणिपूरच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात राजकारण सुरू असताना राज्यसभेत स्मृती इराणी यांनी याच मुद्द्यावर राहुल गांधींवर टीका केली. मणिपूरच्या मुद्द्यावर स्मृती इराणी कधी बोलणार असा सवाल विरोधकांकडून विचारला गेल्यावर त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

इराणी म्हणाल्या की, काँग्रेस मणिपूरच्या हिंसाचारातील तथ्य दडवत आहे. एवढेच नव्हे तर राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली आहे. प्रश्नकालादरम्यान इराणी यांनी हा हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या खासदार अमी याज्ञिक यांनी इराणी यांना सवाल विचारला की, मणिपूरच्या विषयावर त्या कधी बोलणार आहेत. त्यावरून इराणी संतापल्या. या प्रश्नावर त्यांनी आक्षेप नोंदविला. त्या म्हणाल्या की, केवळ महिला मंत्र्यांनीच नव्हे तर सगळ्या महिला नेत्यांनी मणिपूरप्रमाणेच छत्तीसगड, राजस्थान, बिहार या ठिकाणी होत असलेल्या घटनांवर बोलले पाहिजे.या राज्यातील घटनांबाबत बोलण्याची हिंमत या महिला नेत्यांमध्ये आहे का?

केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या की, आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे का की आपण छत्तीसगढमधील घटनांबाबत बोलू शकाल. आपल्यात एवढी हिंमत आहे का की, आपण राजस्थानबाबत बोलाल. आपल्यात एवढी ताकद आहे की, आपण राजस्थानबाबत बोलाल. या सगळ्या नेत्यांमध्ये ही हिंमत आहे का की, ते सांगतील राहुल गांधी हे मणिपूरमध्ये गेल्यानंतर हे राज्य आगीत लोटले गेले.

काँग्रेसशासित राज्यांमधील बलात्कारांच्या घटनांबाबत बोलण्याचे साहस या महिला नेत्यांमध्ये आहे का, असा सवालही इराणी यांनी विचारला. जर त्या महिला नेत्या या राज्यातील घटनांबाबत बोलू शकत नसतील तर त्यांनी महिला मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

त्याआधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरच्या विषयावर सर्वांना चर्चेचे निमंत्रण दिले. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांना अमित शहांनी पत्र पाठवून मणिपूरच्या चर्चेसाठी आमंत्रित केले. या विषयावर चर्चा होण्यासाठी अमित शहा यांनी विरोधकांना अनुकूल वातावरण तयार करण्याची विनंती केली.

Exit mobile version