रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

रिंकु शर्माच्या हत्येबाबत काही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे काही नव्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या वादातून झाली असून त्याला धार्मिक रंग नसल्याचे सांगणाऱ्या डाव्या मीडीयाचा पर्दाफाश झाला आहे.

हे ही वाचा: 

रिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू

एबीपी न्युज सोबत बोलताना, राजपाल यांनी सांगितले की पोलिस ठाण्यात आरोपींनी ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या घोषणा मंगोलपुरी पोलिसांसमोर दिल्या, आणि पोलिसांनी त्यांना थांबवण्यासाठी काहीही केले नाही. आरोपी पोलिस ठाण्यात धार्मिक घोषणा देत असताना गप्प बसून होते.

यावेळी शेजाऱ्यांनी सांगितले की, रिंकु शर्माची हत्या राम मंदिर निर्माण निधी संकलनावरून वाद झाल्यानेच झाली होती. राजपाल यांनीच दिलेल्या माहितीनुसार रिंकु शर्मा आणि त्याची हत्या केलेल्या तरूणांत अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या जागृतीसाठी ५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या रॅली नंतर वाद झाला होता. त्यानंतर भडकलेल्या मुस्लिम युवकांच्या टोळीने १० फेब्रुवारी रोजी रिंकुच्या घरावर हल्ला केला.

राजपाल यांनी असेही सांगितले की, मुस्लिम टोळक्याने थंडपणे रिंकुची हत्या केली. रिंकु बजरंग दलाचा धडाडीचा कार्यकर्ता होता. रिंकुने त्या हल्लेखोरांपैकी एकाच्या पत्नीला रक्तदान करून तिचा जीव वाचवला होता. अजून एका हल्लेखोराच्या वडिलांना देखील रुग्णालयात दाखल करायला मदत केली होती.

१० फेब्रुवारी रोजी २५ वर्षीय बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या रिंकु शर्माची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुस्लिम बहुल मंगोलपुरी विभागात त्याच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. रिंकु आणि त्या हल्लेखोरांच्या मध्ये वाद झाला होता. तात्पुरता तो वाद मिटला मात्र नंतर त्यांनी रिंकुच्या घरी त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर रिंकुला त्याच्या घरापासून ३०० मीटर दूर असलेल्या रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

Exit mobile version