आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. भाजपाकडूनही काही नावांची यादी जाहीर करण्यात आली असून काँग्रेसकडून आत्तापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या पाच याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आता काँग्रेसने आणखी एक यादी जाहीर केली आहे.
रविवार, २५ मार्च रोजी काँग्रेसकडून सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने आपली सहावी यादी समोर आणली असून पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये चार जागा या राजस्थान तर एक तामिळनाडूतील आहे. अजमेर, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि तामिळनाडूतून तिरुनेलव्हेली या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, अजमेरमधून रामचंद्र चौधरी तर कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे.
यापूर्वी चंद्रपूरमधील प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १२ उमेदवारांच्या नावांची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत राजस्थानमधील चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांचे नाव निश्चित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर चंद्रपूरमधून विजयी झाले होते. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात सुरेश धानोरकर यांचे निधन झाले. त्यामुळे, काँग्रेसने यंदा त्यांच्या पत्नीला लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे.
हे ही वाचा:
प्रभू रामललाने भव्य महालात साजरी केली होळी!
मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!
ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!
जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी चोरीला
काँग्रेसने २३ मार्च रोजी ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तर काँग्रेसने आतापर्यंत ५ याद्यांमधून १८६ उमेदवार जाहीर केले होते. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून राजस्थानमधील ४ आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे.