महाराष्ट्रातील कोविडची स्थिती चिंताजनक

महाराष्ट्रातील कोविडची स्थिती चिंताजनक

केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य आणि केंद्रीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्हि. के. पॉल हा महाराष्ट्रातील कोविड गंभीर मामला असून सरकारला त्याविषयी चिंता आहे, असे वक्तव्य केले आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना भारतातील कोविड-१९ ची परिस्थिती गंभीर आहे आणि महाराष्ट्राती कोविड परिस्थिती हलक्यात घेता येणार नाही असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वात जास्त म्हणजे १ लाख रुग्णसंख्या आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ज्या राज्यांत पुन्हा एकदा कोविड डोकं वर काढू लागला आहे त्या राज्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांना अधिक कसोशीने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून

इंडियन काऊंसिल फॉर मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीला गंभीर म्हटले आहे आणि त्यांनी कोविड मधील ही वाढ नव्या प्रकारच्या विषाणूमुळे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लसींबाबत केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडून लसींचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच लसीकरण मोहीम आता खासगी रुग्णालयांमार्फत करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लस ₹२५० किंमतींत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Exit mobile version