‘मुंबईची परिस्थिती ही पश्चिम बंगाल राज्यासारखी झाली आहे’ असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी रविवार, ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सकाळी १२ च्या सुमारास मुंबईतील गणेशोत्सवांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांच्या दरबारी आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या राज्यपालांसमोर मांडल्या.
हे ही वाचा:
लोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार
जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी
८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?
…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी
या भेटीनंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हिंदू सणांना संपवण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. सरकारने गेल्याच वर्षीची नियमावली यावर्षीही तशीच जाहीर केली आहे. फक्त त्यात तारीख बदलली आहे. घरगुती गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आणले आहेत. मूर्तींचे विसर्जनही घरेच करायचे. त्यासाठी महापालिका तुमच्या येणार. होर्डिंग्स लावण्यावर बंदी घालण्यात अली आहे. आता होर्डिंग्स लावून कोरोना पसरतो का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
या सर्व परिस्थितीमुळे राज्यातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे राणे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आणि त्यातही विशेषतः कोकण पट्ट्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकण पट्ट्यात नेमके काय नियमावली असणार आहे? गणेशोत्सवाच्या काळात कोकणासाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार का? या कोणत्याच गोष्टींवर निर्णय जाहीर केला जात नाही. तर २५ पत्र लिहूनही मुख्यमंत्री उत्तर देत नसल्याचे राणे यांनी सांगितले.