‘अमर्त्य सेन तथ्यावर बोलत नाहीत, ही चिंतेची बाब’

‘अमर्त्य सेन तथ्यावर बोलत नाहीत, ही चिंतेची बाब’

“तथ्यांच्या आणि डेटाच्या आधारावर बोलण्याऐवजी काही तज्ज्ञ  स्वतःच्या वैचारिक चौकटींमधील कैदी होऊन बसले आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे.” असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना टोला लगावत सीतारमण यांचं हे वक्तव्य असल्याचं सांगितलं जात आहे. “झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.” असंही त्या म्हणाल्या.

मोसावर-रहमानी सेंटर फॉर बिझनेस अँड गव्हर्नमेंटने मंगळवारी आयोजित केलेल्या संभाषणादरम्यान, निर्मला सीतारमण यांना हार्वर्डचे प्राध्यापक लॉरेन्स समर्स यांनी विचारले की “आमच्या समाजातील लोकांनी, विशेषत: अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.”

यावर सीतारमण म्हणाल्या की, भाजपा सत्तेत नसलेल्या राज्यांमध्ये हिंसाचाराचा मुद्दाही पंतप्रधानांच्या माथी मारला जातो. तुम्ही उल्लेख केलेल्या डॉ अमर्त्य सेन यांच्याबद्दल मी म्हणेन की, एक ‘विद्वान’, जो तथ्यांवर आधारित बोलत नाही, ही चिंताजनक बाब आहे. विद्वानांवर आता तथ्यांच्या आधारावर टिप्पणी करण्याऐवजी त्यांच्या वैयक्तिक आवडी -निवडींचा जास्त प्रभाव पडू लागला आहे. ही खरोखर चिंताजनक बाब आहे. विद्वान समविचारी होण्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या आवडी -निवडीत कैद होऊ शकतात. तथ्य आणि डेटा समोर ठेवणे ही एक गोष्ट आहे आणि ती वस्तुस्थितीवर आधारित आहे. जर मते पूर्वग्रहातून तयार झाली असतील तर मी त्याचा प्रतिवाद करू शकत नाही.” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

महिन्याचा पास सक्तीचा असल्यामुळे विनातिकीट प्रवाशांची गर्दी

शरद पवार आयकर छाप्यांबाबत बोलणार?

“कधीकधी अशा व्यक्तीला तथ्य सांगणं हा झोपेचे सोंग घेणाऱ्या एखाद्याला जागं करण्याचा प्रयत्न असतो. जर तुम्ही खरोखर झोपत असाल तर मी तुम्हाला ‘कृपया उठा’ असे म्हणू शकते. पण जर तुम्ही झोपेचे नाटक करत असाल, मी काहीही करू शकत नाही.” असंही त्या म्हणाल्या.

Exit mobile version