खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी संसदेमध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. शेवाळे यांनी उपस्थितफ केल्याचे गुरुवारी विधानसभेत जोरदार पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
भाजपचे आमदार भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. दिशा सालियन प्रकरणी एसआयटी स्थापन करा, अशी मागणी सत्ताधारी पक्ष कडून करण्यात आली. भाजपच्या महिला आमदारांनी देखील हा मुद्दा उचलून धरत विरोधकांना कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला. भरत गोगावले यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर आमदार नितेश राणेही बोलायला उभे राहिले. त्यावेळी सभागृहात गोंधळ सुरु झाला. या गोंधळातही नितेश राणे आपला मुद्दा मांडत होते. पण गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केलं.
सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर नितेश राणे व इतर नेत्यांनी दिशा सालियानचा मुद्दा पुन्हा लावून धरत चौकशीची मागणी केली. त्यानंतर पुन्हा गोंधळ वाढल्याने सभापतींनींनी २० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली. दिशा सालियानचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर न येणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, अशी मागणी गोगावले आणि नीतेश राणे यांनी केली.
हे ही वाचा:
…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात
मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!
भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की , ९ जून २०२० मध्ये दिशा सालियनचा मृत्यनं झाला या मृत्यूच्या चौकशीची पुनर्मागणी सभागृहाने केली आहे दिशा सालियन चा मृत्यूनं झाला त्यावेळी मुंबई पोलीस तपस करत होते सुशांतची चौकशी सीबीआय करत होती तत्कालीन सरकारच्या दबावाखाली तो तपस झाला आहे असे आम्हाला वाटत आहे एखाद्या तरुण मुळीच आत्महत्या दाखवली जाते हे स्प्ष्ट होणे गरजेचे आहे त्याकरिता तिचा पोस्टमार्टेम रिपोर्ट फासेच इतर सर्व रिपोर्ट जनतेसमोर येणे गरजेचे आहे या मागे कोणाची शक्ती आहे का , कोणाचे फोटो उपलब्ध झाले हे पाहणे गरजेचे आहे दोन दोन तरुण मूळ या वयात आत्महत्या करू शकतात या वयामध्ये त्यांच्यावर असा कोणता प्रसंग आला की त्यांना आत्महत्या करावी लागली असा प्रश्न उपस्थित केला. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सभागृह बाहेर निदर्शने केली.