तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदींना अडकविण्यासाठी घेतले होते ३० लाख!

तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदींना अडकविण्यासाठी घेतले होते ३० लाख!

एसआयटीने प्रतिज्ञापत्रात केला दावा

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीनंतर कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याचा कट रचला होता, असा दावा एसआयटीने न्यायालयात केला आहे. गुजरात दंगलीतील तिस्ताच्या भूमिकेची चौकशी करणाऱ्या एसआयटीने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडून तिस्ता यांनी यासाठी ३० लाख रुपये घेतले होते. , गुजरातचे तत्कालीन डीजीपी आरबीके श्रीकुमार आणि माजी आयपीएस संजीव भट्ट यांचाही तिस्तासोबतच्या या कटात सहभाग होता असे एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

अहमद पटेल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव होते, ते गुजरातमधून राज्यसभेचे खासदारही होते.२०२० मध्ये त्यांचे निधन झाले. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अस्थिर करण्याचा कट या लोकांनी रचला होता असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्याकडून तिस्ताला एकदा ५ लाख आणि २५ लाख रुपये मिळाले होते असे अहमदाबाद सत्र न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एसआयटीने म्हटले आहे. गुजरात दंगलीप्रकरणी तुरुंगात असलेल्या तिस्ताच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन याचिकेला विरोध करताना एसआयटीने ही माहिती दिली. गुजरात एसआयटीने २५ जून रोजी तिस्ताला तिच्या मुंबईतील घरातून अटक केली होती. एसआयटीच्या खुलाशानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधताना भाजपने काँग्रेसचे षडयंत्र समोर आल्याची टीका केली आहे.

तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे साथीदार मानवतेनुसार काम करत नव्हते. ते राजकीय हेतूने काम करत होते असे एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तिस्ताच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. २००२ला झालेल्या दंगलीत काँग्रेसच्या एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीने याचिका करून नरेंद्र मोदी याला जबाबदार असल्याचे म्हटले होते. पण त्यांना मोदींविरोधात उसकावण्याचे काम तिस्ता सेटलवाड यांनी केले होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांच्यावर ताशेरे ओढले होते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

बदनाम करण्याचे सत्य बाहेर येत आहे

गुजरात दंगलीत काँग्रेसने नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा ज्याप्रकारे कट रचला होता, त्याचे सत्य बाहेर येत आहे असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुजरातचे तत्कालीन सरकार अस्थिर केले पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्यात निरपराध लोकांना सामील करून घेणे असे दाेन हेतू त्यांच्याकडे हाेते. अहमद पटेल यांनी पैसे पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला.

Exit mobile version