दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांचे कॅबिनेटमधील सहकारी सत्येंद्र जैन हेदेखील वर्षभर तुरुंगात आहेत, त्यांनीही आपला राजीनामा सादर केला आहे.
सिसोदिया यांच्याकडे ३३ पैकी १८ खात्यांची जबाबदारी आहे. त्यांना रविवारी सीबीआयने अटक केली. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात जामीन घेण्यासाठी गेले पण सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितल्यानंतर आता ते उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतील.
हे ही वाचा:
देशावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या सर्फराजची गठडी वळली
व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?
अँटिलिया स्फोटके,हिरेन हत्याकांड प्रकरणाची लवकरच वेब सिरीज
उद्धव ठाकरे- केजरीवाल भेटीमागे मद्य घोटाळ्याचे कनेक्शन तर नाही ना?
सिसोदिया यांच्यावर मद्य घोटाळ्याचे आरोप आहेत. २०२१-२२मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया व जैन यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता मंत्रिमंडळात दोन नव्या मंत्र्यांची निवड केली जाईल.
गेल्या वर्षी मे महिन्यात जैन यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर आरोग्य खाते सिसोदियांकडे आले होते.
या दोघांच्या राजीनाम्याआधी दिल्ली सरकारमध्ये सहाच मंत्री होते. त्यातील सिसोदियांकडे ३३पैकी १८ खाती होती तर गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन, राज कुमार आनंद हे इतर मंत्री होते. एकूणच उरलेली १५ खाती ही या सगळ्या मंत्र्यांमध्ये विभागली गेली होती.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मात्र एकही खाते नव्हते. ते आता यापैकी काही खाती घेणार का, याविषयी चर्चा सुरू आहेत. आता आमदार आतिषी व सौरभ भारद्वाज यांच्याकडे मंत्रिपदे सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. जर सिसोदिया आणि जैन यांना दोन वर्षांची शिक्षा झाली तर पुढील सहा वर्षे ते निवडणूक लढवू शकणार नाहीत.