विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात मेट्रो ट्रायलचं उद्घाटन झालं. काही लोकांनी मेट्रो आणली तेव्हा ती होईल की नाही, असा प्रश्न केला होता. मात्र, आता पुणेकरांच्या सेवेत मेट्रो येतेय, अशी प्रतिक्रिया फडवणीस यांनी दिली. यापुढे पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार असल्याचे फडवीसांनी सांगितले. तसेच नाशिकच्या धर्तीवर पुण्यात नियो मेट्रो आणता येईल का याची चाचपणी करा, असाही सल्ला फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन मेट्रो आल्या आहेत. पीपीई खाली एक सेवा सुरू करतोय. काही लोकांनी मेट्रो आणली तेव्हा होईल की नाही असा प्रश्न केला होता. देशात दोनच मेट्रोने काम केलं त्यात एक नागपूर आणि दुसरे पुणे. आता एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार आहे. ट्रॅव्हल प्लॅन तयार केला जाणार आहे. १०० टक्के इंटिग्रेशन करता येईल. देशात सर्वाधिक टू व्हीलरची संख्या पुण्यात आहे. ४५ लाख टू व्हीलर पुणे शहरात आहेत.
राज्यात नाशिक मॉडेल होत आहे. तिथं नियो मेट्रो सुरु होत आहे. वाराणसीलासुद्धा हा प्रकल्प होतोय. मेट्रोच्या २५ टक्के रकमेत तो प्रकल्प होतो. दोन कॉरिडॉर एकत्र करून नियो करता येईल का याचा विचार करा. केंद्रसुद्धा याबाबत मदत करेल. त्याचप्रमाणे नाशिकच्या नियो मेट्रोच्या धर्तीवर पुण्यात नियो मेट्रो आणता येईल का? याची चाचपणी करा, महाराष्ट्राच्या महामेट्रोलाच काम देता येईल का ते पण बघा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिला.
हे ही वाचा:
कोविडचा फायदा घेत मुंबईत मोठा घोटाळा
व्हॉट्सऍप्पची नांगी, सरकारच्या नियमांचं पालन करणार
अफगाण महिला तालिबान विरुद्ध शस्त्रसिद्ध
बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार
१० रुपयांत प्रवास सुरु केला, त्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी कल्पकतेने बस सेवा सुरू केली. पुणे पालिकेने पुण्य नगरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलाय. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम करता सुलभता हवी, वेळेची खात्री हवी त्यासाठी डिजिटल ऍप्प लवकरच सुरू करणार असल्याचंही फडवणीस म्हणाले.