गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश

सनातनशी घट्ट नातं असलेल्या लोकांमध्ये सहभागी होत असल्याची व्यक्त केली भावना

गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. अशातच सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून दुसरीकडे पक्ष प्रवेशांची संख्याही वाढली आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाची वाट धरत कमळ हातात घेतले आहे.

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला. दुपारी त्यांनी भाजपा कार्यालय गाठून पक्षात प्रवेश केला. देशात लवकरच लोकसभा निवडणुका होत असताना अनुराधा पौडवाल भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, “आज मी अशा लोकांमध्ये सामील होत आहे ज्यांचे सनातनशी घट्ट नाते आहे. चित्रपटसृष्टीत गाल्यानंतर मी भक्तीगीतेही गायली आहेत. रामललाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे गाण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे.”

हे ही वाचा..

‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र

षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढील षटकाला सुरुवात न केल्यास बसणार दंड

लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

“बाल स्वरूपातील मूर्ती साकारताना प्रभू रामचंद्रांनी खूप परीक्षा घेतली”

अनुराधा पौडवाल या एक लोकप्रिय गायिका आहे. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५२ रोजी कर्नाटकातील एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांनी १९७३ मध्ये करिअरला सुरुवात केली. अभिमान चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा श्लोक गायला. १९७३ मध्ये त्यांनी यशोदा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या आवाजामुळे ओळख निर्माण करून प्रसिद्धी मिळवली.

Exit mobile version