काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!

क्रॉस वोटिंगवरून करण्यात आलेल्या आरोपांवरून हिरामण खोसकर यांची टीका

काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमधून उभा राहिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा परभव झाला. मतदान करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय या आमदारांवर पक्ष श्रेष्ठींकडून कारवाई होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. या आमदारांमध्ये काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, यावर खोसकर यांनी स्पष्टीकरण देत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून सुरु असलेली बदनामी थांबली पाहिजे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन बदनामी थांबवली पाहिजे, असं हिरामण खोसकर म्हणाले आहेत. कोणत्या आमदारानं कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे ठरलं होतं त्यानुसारचं मतदान केल्याचे हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय माध्यमांशी बोलताना आमदार हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. शपथ घेऊनही त्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप केले. तसेच नाना पटोले यांनी मतदारसंघात काय चाललंय, याबद्दल कधीच विचारलं नाही,” असं म्हणत खोसकर यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली.

“तिकीट द्यायचं नसल्यास देऊ नका. पण बदनाम करु नका. याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. तसेच पक्ष श्रेष्ठी बदनामी करत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार अध्यक्षांवर नाराज असून त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. याबद्दल शपथ घेऊन देखील सांगितलं, तरी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ज्यांची मतं फुटली त्या सहा जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आले,” अशी नाराजी व्यक्त करत हिरामण खोसकर यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा:

विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या

डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात; पाच भाविकांचा मृत्यू

विशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करा, शस्त्रसाठा जप्त करा

मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

काँग्रेसची सात मतं ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना द्यायची आणि उरलेली मतं शेकापच्या जयंत पाटील यांना द्यायचं ठरलं होतं. त्या पद्धतीनं नाना पटोले, कैलास गोरंट्याल आम्ही सगळे गेलो. एकत्र गेलो आणि मतदान केलं. उद्धव ठाकरे यांचे १६ आणि आमचे सात अशी २३ मतं होतात. एक मतं कुणाचं फुटलं हे न्यायालयाकडून आदेश घेऊन चेक करा, असं हिरामण खोसकर म्हणाले.

मतदानावेळी पहिली पसंती मिलिंद नार्वेकर, दुसरी जयंत पाटील आणि तिसरी प्रज्ञा सातव असे मतदान केले आहे. तरीही चुकीची बदनामी सुरू आहे. जे आमदार फुटलेत त्यांच्यावर कारवाई करावी, असं हिरामण खोसकर म्हणाले.

Exit mobile version