एकीकडे भारताविरुद्ध खलिस्तानी चळवळीतील काही नेते कटकारस्थाने रचल्याचा आरोप होत असताना ब्रिटनमधील शिख समुदायाने मात्र भारतविरोधात ब्रिटनमधील काही लोक जे चित्र उभे करत आहेत, त्याला तीव्र विरोध केला आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिख धर्मियांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून जाहीर केल्यानंतर ब्रिटनमधील शीख धर्मियांनी त्या निर्णयाचे स्वागत केले. ब्रिटनमधील शीख धर्मियांनी एका मेळाव्यादरम्यान मोदींचे आभार मानले. तेथील पार्क अव्हेन्यू भागातील गुरुद्वारात झालेल्या या मेळाव्यादरम्यान या समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत केला आणि शीख समुदायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार खूप काही करत असल्याबद्दल कौतुकोद्गारही काढले.
हे ही वाचा:
ख्रिश्चन धर्म स्वीकारा; भेटवस्तूची आमिष दाखवून शिक्षकाची शिकवण
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा कराचीत मृत्यू
१२ ते १४ वयोगटातील मुलांना मार्चमध्ये मिळणार कोरोना सुरक्षा कवच?
मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय
गुरु गोविंद सिंग यांच्या ३६५व्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी गोविंद सिंग यांच्या दोन सुपुत्रांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण म्हणून २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून जाहीर केला. त्यावेळी पंतप्रधानांनी शीख गुरुंनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली होती तसेच भारताच्या जडणघडणीत शीख गुरुंचा मोठा वाटा होता, असेही पंतप्रधान म्हणाले होते. धार्मिक दहशतवादाविरोधात गुरु गोविंदसिंग यांनी उठविलेला आवाज, केलेल्या त्याग, दिलेले बलिदान कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान म्हणाले होते.
पंतप्रधानांच्या या भूमिकेचे ब्रिटनमधील शीख समुदायाने स्वागत केले आणि भारताची तसेच भारतातील केंद्र सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांचा निषेध केला.