सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!

सिद्धू मुसवाला याची रविवार, २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धू मुसवाला याचा गायनाचा प्रवास फार नाही पण फार कमी कालावधीत त्यांनी अशी कीर्ती मिळवली जी कीर्ती मिळवायला इतर कलाकारांना अनेक वर्षे लागतात. जेव्हा-जेव्हा मूसवालाचे नवीन गाणे आले, तेव्हा त्या गाण्यासोबत वाद निर्माण झाले. अवघ्या १५ ते २० मिनिटांत गाणे लिहिल्याचा दावा करणाऱ्या सिद्धू मूसवाला याने कधीही आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्सचा प्रचार केला नाही, पण बंदूक कल्चर सोडलं नाही.

सिद्धू मुसवाला याचा पोलिसांसोबतचा AK-47 चालवतानाचा फोटो व्हायरल झाल्यावर हा गायक चर्चेत आला होता. स्वतःची अटक टाळण्यासाठी तो भूमिगतही झाला होता. गाण्यात तो पाच पोलिसांसह AK-47 आणि वैयक्तिक पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण घेताना दिसत होता. या व्हिडिओच्या आधारे त्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी मुसवालाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तपास सुरू केला होता. त्यानंतर सिद्धू मुसवाला याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

हे ही वाचा:

लोनऍप वाल्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

भाजपचा तिसरा उमेदवार, सातवा उमेदवार आल्याने स्पर्धा

पुतीन यांचा मृत्यू? ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा दावा

नेपाळमधील त्या बेपत्ता विमानात ठाण्याचे चार प्रवासी

वाहनावर काळ्या काचा वापरल्याबद्दल सिद्धू यांच्या नावे चलान काढण्यात आले होते. जुलै २०२० मध्ये संजू रिलीज झाल्यानंतर, मूसवालाने एक गाणे प्रदर्शित करून त्याने त्याच्यावरील आरोपांचे वर्णन संजय दत्तवरील आरोपांसारखे असल्याचे म्हटले होते. दरम्यान, भारतीय नेमबाज अवनीत सिद्धूने बंदूक परंपरेला प्रोत्साहन दिल्याबद्दल सिद्धू मूसवाला यांच्यावर टीका केली होती.

Exit mobile version