मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

मुंबई काँग्रेसमध्ये आता अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. बांद्रा पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यात तडा गेला आहे. झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांची तक्रार केली आहे.

झिशान सिद्दीकी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. केंद्र सरकारविरोधात काढलेल्या मोर्चात जगताप यांनी आपल्याशी गैरवर्तन केले, धक्काबुक्की केली. माझ्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर केला.

सिद्दीकी यांनी दादरमधील बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह ते शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी अशी पदयात्रा काढली होती. त्यावेळी मुंबई आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सहभागी झाले होते. त्यावेळी राजगृह बाहेर काँग्रसेच्या कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाली. राजगृहात जाण्यावरून भाई जगताप, सिद्दीकी आणि सूरज सिंग ठाकूर यांच्यात वाद झाला. त्यावेळी आपल्याला राजगृह येथे आत जाऊ दिले नाही, असा आरोप सिद्दीकी यांनी केला. केवळ दहा लोकांनाच आत प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आणखी एका घटनेमुळ पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. एका ट्रकवर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. तेथेही सिद्दीकी यांना ट्रकवर चढण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे सिद्दीकी हे पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेले.

 

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा सोमैय्यांना अडवण्याचा प्रयत्न

…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

…म्हणून मुस्लिम महिलांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

 

त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र लिहिले.

Exit mobile version