सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री

अखेर काँग्रेसच्या हायकमांडने मार्ग काढला

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अखेर सिद्धारमय्या यांनी बाजी मारली आहे. ते आता कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री होतील आणि त्यांचे तगडे स्पर्धक डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

निकालानंतर चार दिवस जोरदार बैठका, चर्चा झाल्यानंतर अखेर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धारमय्या यांच्या नावावर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले. तर, डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा २० मे रोजी बेंगळुरूमध्ये होईल.

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यावेळी कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारही तोडगा काढण्यासाठी बैठकीला उपस्थित होते. डी. के. शिवकुमार यांनी सिद्धारमय्या यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वाटून घेण्यास सहमती दर्शवली असल्याचे समजते. मात्र त्यांना पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिली अडीच वर्षे मोठे पद हवे आहे, अशी त्यांनी मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पक्षाच्या हायकमांडलाही सिद्धारमय्या आणि शिवकुमार या दोहोंपैकी केवळ एकट्याने शपथ घ्यावी, अशी इच्छा नव्हती. त्यांना ‘वन मॅन शो’ नाही तर सामूहिक नेतृत्व अपेक्षित होते. मात्र शिवकुमार यासाठी सकारात्मक नसल्याने यातून तोडगा निघत नव्हता. अखेर, अनेक चर्चेच्या फेऱ्याअंती काँग्रेस शिवकुमार यांचे मन वळवण्यात यशस्वी झाली आहे.

हे ही वाचा:

नियमित व्यायाम, योगा करा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवा

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ‘बेस्ट’ मदतीला धावणार

नियमित व्यायाम, योगा करा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवा

मालाड कुरार व्हिलेज येथे मिनी फायर स्टेशन

 

२२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने १३५ जागा मिळवत ऐतिहासिक कामगिरी आहे. तर, भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले असून ‘किंगमेकर’ होण्याचा दावा करणाऱ्या जनता दलाला केवळ १९ जागा मिळाल्या आहेत.

Exit mobile version