खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, दीनदुबळ्यांच्या असतील या सगळ्यांची कामं गेल्या अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत, ती आता या पाच महिन्यात झाली आहेत, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना मातोश्रीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, राज्यातील जी कामं गेल्या अडीच वर्षात झाली नव्हती. त्या कामांना आता वेग आला आहे. गेल्या अडीच वर्षात मातोश्रीचे दारं सगळ्यासाठी बंद होते. अगोदर मंत्री, खासदार, आमदारांनाही मातोश्रीवर प्रवेश नव्हता. मात्र आता आमदार, खासदारांपासून सर्वसामान्य जनतेसाठी मातोश्रीची दारं खुली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. गोरगरीबांची आणि शेतकऱ्यांची कामं गतीने होत असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरसुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांच्याबद्दल आता राज्यातील सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांची सकाळ कोण खराब करते.? असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान, पंतप्रधान, गृहमंत्री बजावणार मतदानाचा अधिकार
लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!
लोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू
हिंदू महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणारा मौलवी अजमलने मागितली माफी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी माङयावधी निवडणुकांचे भाकीत वर्तवले होते. त्यावरूनसुद्धा श्रीकांत यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले होते. आता उरलेले आमदार, खासदार कुठे जाऊ नयेत. ते आपल्या भोवती गिरक्या घेत रहावेत यासाठी मध्यावधी निवडणुकांचे भूत उभे करण्यात येत आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.