“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राला श्रीकांत शिंदेंचे सणसणीत उत्तर

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवरही टीका केली. यात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे ते म्हणाले. तसेच गणेश उत्सव स्पर्धेत कोट्यवधी रुपये वाटले, गणपतीत ६०० गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कुणी भरले? कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सरकारचे बाळराजे हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून चंदा दो आणि धंदा लो या माध्यमातून काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रदेखील पाठवलं आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर हसायचं की रडायचं हे कळत नाही. आजकाल पत्राचाळीचे आरोपीही पत्र लिहायला लागले आहेत. पत्र वाचलं नाही. पण काहींनी सांगितलं की त्यात वैद्यकीय सेवा कशी केली जाते? कुणाला मदत केली जाते? याची माहिती दिली आहे. त्यांच्या तोंडून शिव्यांशिवाय दुसरं काही येत नाही. पण आज फाऊंडेशनच्या कामाबाबत चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. त्यांनी मोदींना पत्र लिहिलंय. म्हणजे त्यांचा मोदींवरचा विश्वास वाढला आहे,” अशी सणसणीत टीका श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

हे ही वाचा:

जळगावात शिंदे गट ४०० पार…ठाकरे गटाला धक्का!

के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

काँग्रेससाठी जाहीरनामा फक्त कागद पण आमच्यासाठी ‘मोदींची गॅरेंटी’!

ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या खात्यात गेल्या काही वर्षांमध्ये ४० ते ५० लाखांची उलाढाल झाली आहे. पण, गेल्या दीड वर्षात त्यातली उलाढाल कोट्यवधींची आहे. हे सगळे पैसे कुठून आले, दानशूर कर्णाचे अवतार कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात बसून बिल्डर्स, कंत्राटदार या सगळ्यांना दिलं जातं आहे. श्रीकांत शिंदेंवर ईडीची कारवाई झाली पाहिजे. हा सगळा पैसा म्हणजे काळा पैसा आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला मिळालेला निधी बेकायदेशीर आहे. असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Exit mobile version