व्यापारी वर्गाची नाराजी अधिक वाढली

व्यापारी वर्गाची नाराजी अधिक वाढली

महाराष्ट्रात निर्बंधांची मालिका अजूनही काही केल्या संपत नसल्याने, आता व्यापारी वर्गाच्या संयमाचे बांध तुटलेला आहे. ठाकरे सरकारविरोधात व्यापारी वर्ग आता रस्त्यावर उतरण्याचे केवळ बाकी राहिलेले आहे. आत्ताच्या घडीला देशातील अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केलेले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, केरळ या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळेच आता व्यावसायिकांमध्ये महाराष्ट्रातील निर्बंधांविषयी कमालीची अस्वस्थता आहे.

हे ही वाचा:

अखेर शिक्षकांवर बसप्रवास करण्याची मेहेरबानी

वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आगरी सेनेचा एल्गार

झोमॅटोचा आता ‘शेअर्स’चा ऑप्शन

डेन्मार्क, इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक

ठाकरे सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे अनेक उद्योग आजच्या घडीला कायमस्वरुपी बंद पडले आहेत. केवळ इतकेच नाही तर, उपाहारगृहासारखे अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळेच आता खायचे काय हा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे. कोरोनाशी लढताना आता दीड वर्षे उलटले. महाराष्ट्रात सर्वात अधिक काळ टाळेबंदी झाल्यामुळे उद्योग व्यवसायांवर आर्थिक गंडातर आलेले आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांनी तर दुकाने उघडी ठेवू असा इशाराही दिला होता. ठिकठिकाणचे व्यापारी आता बंडाची भाषा बोलू लागले आहेत. दुकानांची भाडी भरणेही त्यांना मुश्किल झाल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करून दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी ते करत आहेत. सध्या शनिवार, रविवार दुकाने बंद राहतील, असा नियम असल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होते आहे.

उत्तर प्रदेशात कंटेनमेंट झोनच्या व्यतिरिक्त अन्यत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मॉल्स, रेस्तराँ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने खुले ठेवण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने, बाजार हे सोमवार ते शुक्रवार खुले ठेवता येणार आहेत. दिल्लीत सकाळी १० ते रात्री ८ या काळात बाजार, मॉल्स, दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तामिळनाडूत शॉपिंग मॉल्स, देवस्थाने, व्यायामशाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version