दिल्लीमध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या तीन महानगर पालिकांची एकच महानगर पालिका करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. आम आदमी पार्टीने या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आम आदमी पार्टीच्या एका नेत्यानं आपल्याला निवडणुकीचं तिकीट दिलं नाही, म्हणून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
हसीब-उल-हसन असे नेत्याचं नाव असून त्यांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी भलताचं मार्ग अवलंबला आहे. आम आदमी पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये आपलं नाव नसल्यामुळे आपचे एक माजी नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी थेट विजेच्या ट्रान्समीटरवर चढून आंदोलन केले. तसेच माझा मृत्यू झाला तर माझ्या मृत्यूला आपचे नेते जबाबदार असतील असंही हसन यांनी म्हटलं आहे.
Unhappy over not given ticket to contest upcoming MCD poll, former councillor former #AAP, Haseeb-ul-Hasan, climbs a transmission tower and threatens to end his life. Hasan alleges AAP leaders for deliberately blocking his candidature this time. #MCDElection pic.twitter.com/40NJJocu8J
— Ashish Srivastava (@AshishOnGround) November 13, 2022
हे ही वाचा:
दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाचा विरोध
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात
गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली
बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी
ट्रान्समीटरवर चढून आप नेत्याने स्वतःचा एक व्हिडीओसुद्धा बनवला आहे. जर माझा मृत्यू झाला, तर त्यासाठी आपचे दुर्गेश पाठक, आतिषी हे असणार. कारण माझी सगळी मूळ कागदपत्र या लोकांनी जमा करून घेतली आहेत. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मी वारंवार मागणी करूनही कागदपत्र दिली जात नाही आहेत. तुम्ही मला तिकीट द्या किंवा नका देऊ, पण माझी कागदपत्र मागणं हा माझा अधिकार आहे, असं हसन यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.