युपीमध्ये काँग्रेसला धक्का, वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा भाजपात!

भदोही मतदार संघातून उभे राहण्याची शक्यता

युपीमध्ये काँग्रेसला धक्का, वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा भाजपात!

लोकसभा निवणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.वाराणसीचे माजी काँग्रेस खासदार राजेश मिश्रा यांनी काँग्रेसला बाजूला सारत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजपनेते रविशंकर प्रसाद आणि अरुण सिंह यांच्या उपस्थितीत दिल्लीत राजेश मिश्रा यांनी भापजमध्ये प्रवेश केला.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात युती झाल्याची घोषणा झाल्यापासून ते नाराज होते.त्यांनी स्वतः उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने त्यांना देवरियातून उमेदवारी दिली होती.यावेळीही ते तिकिटाचे दावेदार होते.मात्र, ते देवरियातूनच नव्हे तर भदोहीमधून सुद्धा लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भदोहीमधून ते उभे राहू शकतात, असे मानले जात आहे.

हे ही वाचा:

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात!

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज

राजेश मिश्रा हे २००४ ते २००९ या काळात वाराणसीचे खासदार होते.त्यावेळी त्यांनी तेव्हाचे भाजपचे शक्तिशाली नेते आणि अनेक वेळा खासदार राहिलेले शंकर जयप्रसाद जैस्वाल यांचा पराभव केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये आपला अपमान होत असे.ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी वाराणसीचे खासदार आहेत ही भाग्याची गोष्ट आहे.संपूर्ण जगभरात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे.

काँग्रेस पक्षावर टीका करत म्हणाले की, राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ नाहीतर ‘भारत तोडो न्याय यात्रे’प्रमाणे काम करत आहेत.अनेक वरिष्ठ नेते पक्षावर नाराज आहेत.त्यांनी दावा केला की, काँग्रेसची संघटना संपली असून बूथ स्थरावरील एकही कार्यकर्ता शिल्लक नाही.गेल्या ३० वर्षात काँग्रेसची स्थिती अधिकच खालावली आहे, आहे राजेश मिश्रा यांनी सांगितले.

Exit mobile version