लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते रोहन गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांना गुजरातमधून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी तिकीट परत केले होते.
रोहन गुप्ता यांनी मागील महिन्यात २२ मार्च रोजी काँग्रेसचा निरोप घेतला होता.काँग्रेसच्या संपर्क विभागातील एका वरिष्ठ नेत्याकडून ‘सतत अपमान आणि चारित्र्यावर प्रश्नचिन्ह’ असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.मात्र, त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव सांगितले नाही.काँग्रेसने रोहन गुप्ता यांना अहमदाबाद पूर्व मतदार संघातून उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी १८ मार्च रोजी आपले नाव मागे घेतले.
हे ही वाचा:
हार्दिक आणि कुणाल पंड्याच्या सावत्र भावाला अटक!
केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!
“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”
“नेहरूंमुळे भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनता आले नाही”
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहन गुप्ता म्हणाले की, “मला या नवरात्रीत भाजपमध्ये सामील झाल्याचा अभिमान वाटतो. कोणत्याही अपेक्षा न ठेवता देशाला पुढे नेण्यात मला योगदान द्यायचे असल्याचे ते म्हणाले.” ते पुढे म्हणाले, “मी गेली १५ वर्षे काँग्रेसमध्ये होतो, तर माझे वडील ४० वर्षे काँग्रेसमध्ये होते. आमच्या कुटुंबाने कोणतीही अपेक्षा न ठेवता काँग्रेससाठी काम केले. मात्र आमचा अपमान केला जात आहे आणि आमचा स्वाभिमान ठेचला जात आहे. त्यामुळेच मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, १२ मार्च रोजी जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवारांच्या यादीत रोहन गुप्ता यांचेही नाव होते. मात्र त्यांनी उमेदवारी मागे घेतली. वडिलांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते निवडणूक लढवू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.