शरद पवारांचा फोटो वापरू नका! सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवारांना आदेश!

अजित पवार गटाला लेखी स्वरूपात लिहून देण्याच्या न्यायालयाकडून सूचना

शरद पवारांचा फोटो वापरू नका! सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवारांना आदेश!

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडून एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट निर्माण झाला.यानंतर नेते, कार्यकर्ते दोन्ही गटात विभागले गेले.मात्र, शरद पवार यांचे नाव आणि त्यांच्या फोटोचा वापर दोन्ही गटाकडून वापरण्यात येतो.जरी निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं असलं तरी शरद पवारांच्या नावावरून आणि फोटोवरून दोन्ही गटात वाद सुरूच होता.या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.यावर आज सुनावणी पार पडली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून याचिकेत म्हटले होते की, अजित पवार गट मतदारांकडून मत मागण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा आणि त्यांच्या फोटोचा वापर करत आहे.यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला गटाला चांगलंच फटकारलं.न्यायालयाने म्हटले की, निवडणुका जवळ येत आहेत म्हणून तुम्हाला शरद पवार यांची गरज भासत आहे.जर निवडणुका नसत्या तर तुम्हाला त्यांची गरज भासली नसती.आता तुमची एक वेगळी ओळख आहे.त्याच नव्या ओळखीने तुम्ही मतदारापर्यंत जा, असे न्यायालयाने सांगितले.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपात!

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!

पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

सुनावणीदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला.अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात काही पोस्टर दाखवले, ज्यामध्ये अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो आणि नावाचा वापर करण्यात आला होता.अजित पवार गटाने शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करू नये अशी आमची मागणी आहे, असे सिंघवी यांनी न्यायालयात म्हटले.

याची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला खडे बोल सुनावले.शरद पवार यांचे नाव आणि फोटो कोणत्याही स्तरावर वापरणार नाही, असे अजित पवार गटाला लेखी स्वरूपात लिहून देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या.दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्चला होणार आहे.

Exit mobile version