ठाकरे सरकारमुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा आता अधिकच तीव्र सुरु झालेला आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाकरता भूमिपूत्र विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आता अधिकच धार धरू लागलेला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यामुळे भूमीपूत्र दुखावले गेले आहेत. त्यामुळेच या संघर्षामुळे आता मुंबईतील आगरी कोळी बांधवही शिवसेनेपासून दुरावू लागलेला आहे.
दि. बा. पाटील या नावावर भूमीपूत्र ठाम असून, त्यांच्या आंदोलन कृती समितीने ठाकरे सरकारला आता १५ ऑगस्टपर्यंतचा पर्याय दिलेला आहे. अन्यथा १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम चालू देणार नाही, असा इशारा कृती समितीने दिलेला आहे.
हे ही वाचा:
रंगेल हंटर बायडनचं पितळ उघडं पडलं
पाच राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर
जम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक
कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नका
दि. बा. पाटील या नावासाठी भूमिपूत्रांचा आग्रह हा दिवसागणिक अधिक ठाम झालेला आहे. आंदोलनकर्ते हे भूमिपूत्र असून, दि. बा. पाटील यांच्या कार्याचा त्यांना अभिमान आहे. म्हणूनच ते दि. बा. पाटील या नावावर ठाम राहिलेले आहेत. नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्याचा सरकारने सिडकोकडून निर्णय कळवल्याने हा वाद अधिकच चिघळला. त्यामुळेच आता शिवसेनेचा हक्काचा मतदार शिवसेनेपासून दुरावत चाललेला आहे.
मुंबईतील भूमिपूत्र म्हणून आगरी कोळी समाज हा फार पूर्वीपासून ओळखला जातो. दि. बा. पाटील यांच्याविषयी या समाजामध्ये आदराची भावना फार पूर्वीपासून आहे. शिवाय त्यांच्या कार्याची महतीसुद्धा आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. शेतकरी कायदा, स्त्रीभ्रुण हत्या पायबंद यामध्ये दि. बा. पाटील यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. शिवसेनेच्या हटवादी धोरणामुळे आगरी-कोळी समाजातील आजची पिढी या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळेच येत्या काळात शिवसेनेचा हा हक्काचा मतदार शिवसेनेपासून दुरावला तर यामध्ये आश्चर्य वाटायला नको.